Jeremiah 48:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मवाबच्या विस्तीर्ण द्राक्षमळ्यातून आनंद व सुख निघून गेले. द्राक्षकुंडातील द्राक्षरसाचा प्रवाह मी अडविला आहे. द्राक्षरस काढण्यासाठी द्राक्षे तुडविताना लोक गात वा नाचत नाहीत. तेथे हर्षकल्लोळ नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फळबागेतून, मवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे; द्राक्षकुंडांत द्राक्षारस नाही असे मी केले आहे; हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडवणार नाही; हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडवणार्‍यांचा नसणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मवाबाच्या फळबागेतून व देशातून उत्सव व हर्ष दूर केलेले आहेत. मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षरस नाहीसा केला आहे. ते हर्षाने ओरडून द्राक्षे तुडविणार नाहीत. कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही.