Jeremiah 48:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मला मवाबचे फार वाईट वाटते. बासरीतून शोकसंगीताचे सूर बाहेर पडावेत, त्याप्रमाणे माझे मन रडते. मला कीर हरेसच्या लोकांबद्दल दु:ख वाटते. त्यांचा पैसा, संपत्ती सर्व काही हिरावून घेतले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे मवाबासाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे, कीर-हरेसच्या लोकांसाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे; त्याने संपादिलेले विपुल धन लयास गेले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे; कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे. त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून माझे हृदय मवाबासाठी बासरीसारखे विलाप करीत आहे, माझे हृदय कीर हरेसाच्या लोकांसाठी बासरीसारखे विलाप करीत आहे. त्यांनी मिळवलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.