Jeremiah 48:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मवाबचे तुकडे केले गेले. लोक रडत आहेत. मवाब शरण आला. आता तो खजील झाला आहे. लोक त्याची खिल्ली उडवितात खरे, पण घडलेल्या गोष्टीमुळे ते भयभीतही होतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कसा भंगला आहे! ते कसे हायहाय करीत आहेत! मवाबाने लाजून कशी आपली पाठ फिरवली आहे! मवाब आपल्या सर्व शेजार्यापाजार्यांना हास्य व विस्मय ह्यांचा विषय झाला आहे!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे! मोआबने लज्जेने कशी पाठ फिरविली आहे ते पाहा! मोआब तिच्या सभोवती असलेल्या लोकांच्या उपहासाचा व दहशतीचा विषय झाली आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तो कसा मोडला आहे! आपल्या विलापात कसे आकांत करत आहे! मवाबाने लज्जेने कशी पाठ फिरवली आहे. म्हणून मवाब आपल्या सभोवतालच्या सर्वांना उपहास आणि दहशतीचा विषय झाला आहे.”