Jeremiah 48:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मवाबची शहरे काबीज केली जातील. लपण्याच्या भक्कम जागांचा पाडाव होईल. त्या वेळी, मवाबचे सैनिक, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे भयभीत होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
करीयोथ पडले आहेत, व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत. प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
करोयोथ काबीज झाले आहे आणि त्यांचे बालेकिल्ले जप्त झाले आहेत. कारण त्या दिवशी मवाबी सैनिकांचे हृदय, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.