Jeremiah 48:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मवाबचे लोक लूहीथच्या रस्त्याने वर जाताना मोठ्याने रडत आहेत. खाली, होरोनाईमच्या रस्त्यांवर यातनांचे व दु:खाचे विव्हळणे ऐकू येते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते रडत रडत लूहीथाचा चढाव चढत आहेत; होरोनाईमाच्या उतारावर नाश! नाश! अशी संकटाची आरोळी ऐकू येत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते लुहिथच्या डोंगरावर चढतील व चढताना आक्रोश करीत जातील; व होरोनाईम नगराच्या उतरणीवरून विनाश बघतांनाच्या किंकाळ्या ऐकू येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते रडत रडत लूहीथाच्या टेकडीवर चढत आहेत, कारण खाली होरोनाईमाच्या रस्त्यांवर नाशामुळे किंकाळ्या ऐकू येत आहेत.