Jeremiah 49:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन, मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन. तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसे मी एसावास उघडेबोडके केले आहे, मी त्याची गुप्तस्थाने उघडी केली आहेत, त्याला लपता येत नाही; त्याचा वंश, त्याचे भाऊबंद व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत, तो गत झाला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. त्याचे शस्त्रधारी पुरुष, तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण एसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघड केली आहेत. म्हणून त्याच्याने आपल्याला लपवता येत नाही. त्याची मुले, भाऊ व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत आणि तो गेला आहे.