Jeremiah 49:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्या सिंहाप्रमाणे, एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पाहा, तो सिंहासारखा यार्देनेच्या वनातून वर टिकाऊ कुरणाच्या देशात येईल. कारण मी अदोमाला त्यातून जलद पळून जायला भाग पाडीन आणि जो कोणी मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन. कारण माझ्यासारखा कोण आहे आणि मला कोण हुकूम करीन? कोणता मेंढपाळ मला विरोध करण्यास समर्थ आहे?”