Jeremiah 49:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे. परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल. त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्या स्त्रीप्रमाणे होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, व बस्रावर आपले पंख पसरेल. त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे वेणा देणार्या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल. मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.