Jeremiah 49:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा संदेश केदारच्या कुळांसाठी व हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला. परमेश्वर म्हणतो, “जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी: परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
केदाराविषयी व हासोराची राज्ये, परमेश्वर नबुखद्नेस्सरास हे म्हणत आहे (आता बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर या ठिकणी हल्ला करण्यास जाणार होता) “उठा आणि केदारावर हल्ला करा व पूर्वेच्या त्या लोकांचा नाश करा.