Jeremiah 49:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“हेशबोनच्या लोकांनो, रडा का? कारण आयचा नाश झाला आहे. अम्मोनच्या राब्बातील स्त्रियांनो, शोक करा. शोकप्रदर्शक कपडे घालून रडा! सुरक्षेसाठी शहराकडे पळा! का? कारण शत्रू येत आहे. ते मिलकोम दैवताला, त्याच्या पुजाऱ्याला व इतर अधिकाऱ्यांना नेतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे हेशबोना, हायहाय कर! कारण आय उजाड केलेले आहे; राब्बाच्या कन्यांनो, रडा! आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळा, शोक करा, आवारातून इकडून तिकडे धावा; कारण मिलकोम दैवत, त्याचे याजक व सरदार ह्यांच्यासह, बंदिवान होऊन जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हेशबोना, आकांत कर, कारण आय शहर नष्ट झाले आहे! राब्बाहच्या रहिवाशांनो, तुम्ही आक्रोश करा! गोणपाटाची वस्त्रे धारण करून विलाप करा; भिंतीच्या आत इकडे तिकडे धावाधाव करा, कारण त्याच्या सरदारांसह व पुजार्यांसह दैवत मोलेख बंदिवासात जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे हेशबोना, विलापात आक्रोश कर, कारण आय याचा नाश झाला आहे! राब्बातील कन्यांनो, मोठ्याने ओरडा! तागाची वस्त्रे घाला, आकांत करा आणि तुम्ही व्यर्थ इकडे तिकडे धावाल कारण मिलकोम राजा आपले याजक व अधिकाऱ्याबरोबर एकत्रित बंदिवान होऊन जाईल.