Jeremiah 49:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शत्रू त्यांचे उंट व गुरांचे मोठे कळप चोरेल. ते लोक त्यांच्या दाढीच्या कडा कापतात. मी त्यांना जगाच्या लांबच्या कोपऱ्यात पळून जायला लावीन. मी, त्यांच्यावर, सगळीकडून संकटे आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे उंट लुटले जातील, त्यांचे बहुत कळप लुटीस जातील. दाढीचे कोपरे छाटलेल्यांची दाही दिशांत मी दाणादाण करीन; व चोहोकडून त्यांच्यावर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. या मूर्तिपूजक लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. याहवेह असे जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्यांचे उंट लुटले जातील व त्यांची विपुल संपत्ती युद्धाची लूट अशी होईल. त्यांच्या दाढीच्या कडा कापलेल्यांना सर्व दिशांकडे विखरीन आणि मी त्यांच्यावर सर्व बाजूने संकटे आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.