Jeremiah 49:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ददानच्या लोकांनो, पळा! लपा! का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ददानच्या रहिवाशांनो, पळा, फिरा, दडून राहा; त्याचा समाचार घेण्याची वेळ आली म्हणजे मी एसावावर नेमलेले अरिष्ट त्याच्यावर आणीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ददान प्रदेशातील रहिवाशांनो, मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा, कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन, तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ददानातल्या रहिवाश्यांनो, पळा! माघारी फिरा! जमिनीतल्या विवरात रहा. कारण मी त्यास शिक्षा करणार आहे त्या समयी मी एसावाची अरिष्टे त्याच्यावर आणीन.