Jeremiah 5:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही गोळा केलेले सर्व धान्य ते खातील. ते तुमचे सर्व अन्न खाऊन टाकतील. ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील. ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील (त्यांचा नाश करतील) ते तुमची गुरे, शोळ्या, मेंढ्या खातील. ते तुमची द्राक्षे आणि अंजिरे फस्त करतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील. तुम्ही ज्या शहरांवर विसंबता ती भक्क म शहरे ते नष्ट करतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे पीक व तुझी भाकर जी तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींनी खावी ती ते खाऊन टाकतील, ते तुझी मेंढरे व तुझी गुरे ते खाऊन टाकतील. ते तुझी द्राक्षेवली आणि अंजीर झाडे खाऊन टाकतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील, ज्याच्यावर तुम्ही विसंबून होता.”