Jeremiah 50:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाबेलला वेढा घातलेल्या सैनिकांनो जयघोष करा. बाबेलने शरणागती पत्करली आहे. तिची तटबंदी व बुरुज पाडले आहेत. परमेश्वर त्यांना योग्य तीच शिक्षा करीत आहे. तिच्या लायकीप्रमाणे, तुम्ही राष्ट्रांनी तिला शिक्षा द्यावी. तिने जसे इतर राष्ट्रांशी वर्तन, केले, तसेच तिच्याशी करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यावर चोहोकडून रणघोष करा, त्याने हार खाल्ली आहे; त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पाडले आहेत. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे: त्याच्यावर सूड उगवून घ्या, त्याने केले तसे त्याला करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा! ती शरण येत आहे, तिचे बुरूज धराशायी झाले आहेत, तिच्या तटाच्या भिंती कोसळल्या आहेत. हा याहवेहने घेतलेला सूड आहे, तुम्हीही तिचा सूड घ्या; जसे तिने इतरांचे केले तसेच तिचेही करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्याविरूद्ध तिच्या सर्व सभोवताली विजयाची आरोळी मारा; तिने आपले सामर्थ्य समर्पण केले आहे. तिचे बुरुज पडले आहेत. तिच्या भिंती पाडल्या आहेत, कारण हा परमेश्वराचा सूड आहे. तिच्यावर सूड घ्या. तिने जसे दुसऱ्या राष्ट्रांना केले तसे तिचे करा.