Jeremiah 50:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाबेलमधील लोकांना धान्य पेरु देऊ नका. त्यांना पीक काढू देऊ नका. बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले. पण आता शत्रू सैनिक आले आहेत, त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत. ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलातला पेरणारा, कापणीच्या वेळी विळा चालवणारा नाहीसा करा; जोरदार तलवारीपुढे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे वळेल, प्रत्येक जण स्वदेशाकडे धाव घेईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलच्या शेतकऱ्यांना तिथून काढून टाका, कापणी करणारे आपले विळे घेऊन निघून जावोत. अत्याचाऱ्याच्या तलवारीमुळे प्रत्येकाने आपल्या लोकांकडे परत जावे. प्रत्येकाने आपल्या देशाकडे पलायन करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेलामधील पेरणारा आणि कापणीच्यावेळी विळा चालवणारा या दोघांचा नाश करा. जुलमाच्या तलवारीमुळे ते प्रत्येकजण आपल्या लोकांकडे वळतील; त्यांना आपल्या देशाकडे पळून जाऊ द्या.