Jeremiah 50:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील. ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील. तेथे कोणीही राहणार नाही. माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र हल्ला करेल आणि तिच्या भूमीचा विध्वंस करेल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; लोक आणि पशू पलायन करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उत्तरेकडचे एक राष्ट्र तिच्याविरूद्ध उठले आहे, ते तिचा देश ओसाड करील. तिच्यात कोणीएक मनुष्य किंवा पशूही राहणार नाही. ते दूर पळून जातील