Jeremiah 50:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पुन्हा कधीही बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होणार नाही. जंगली, कुत्रे, शहामृग, आणि वाळवंटातील इतर प्राणी तेथे राहतील. पण कोणीही मनुष्याप्राणी तेथे पुन्हा कधीही राहणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव वनपशू रानकुत्र्यांसह तेथे राहतील, शहामृग तेथे राहतील; तेथे कधीही वस्ती होणार नाही; पिढ्यानपिढ्या तेथे कोणी वस्ती करणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील, व घुबडे येऊन राहतील. येथे आता पुन्हा कधी मानवाची वस्ती होणार नाही; किंवा ही नगरीत पिढ्यान् पिढ्या ओसाड पडेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव रानटी पशू कोल्ह्यासहीत तेथे वस्ती करतील आणि तरुण शहामृग तेथे राहतील; कारण सर्व काळी तिच्यात पुन्हा कोणी कधीही रहाणार नाही. पिढ्यानपिढ्या तिच्यात कोणी वस्ती करणार नाही.