Jeremiah 50:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “कधीतरी, यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपांतून सिंह येईल, व तो शेतांतील गोठ्यांमध्ये जाईल. मग सर्व गुरे दूर पळून जातील. मी त्या सिंहासारखाच असेन. बाबेलच्या भूमीपासूनच मी बाबेलला हुसकून लावीन. ह्यासाठी मी कोणाची निवड करावी बरे? कोणीही माझ्यासारखा नाही. मला आव्हान देणाराही कोणी नाही. म्हणून मीच हे करीन. मला पळवून लावण्यास कोणीही मेंढपाळ येणार नाही. मी बाबेलच्या लोकांचा पाठलाग करीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल; पण मी त्यांना त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन; ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, बाबेलच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पाहा, जसा सिंह यार्देनेच्या दाट झुडुपांतून बाहेर येतो, तसा तो मजबूत वस्तीवर येईल. कारण ते एकाएकी तिच्यापासून पळून जातील, असे मी करीन. आणि जो मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन; कारण माझ्यासारखा कोण आहे? आणि मला कोण आज्ञा देईल? आणि कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?”