Jeremiah 50:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलसाठी परमेश्वराने काय बेत केला आहे तो ऐका. खास्द्यांसाठी परमेश्वराने काय करायचे निश्र्च्ति केले आहे ते ऐका. बाबेलच्या कळपातील (लोकांतील) लहान मुलांना शत्रू फरपटत नेईल. मग बाबेलच्या कुरणांचा संपूर्ण नाश होईल. ह्या घटनेमुळे बाबेलला धक्का बसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे परमेश्वराने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प व खास्द्यांच्या देशाविरुद्ध केलेल्या योजना ऐकून घ्या; ते त्यांना, कळपातील लहानांनादेखील निश्चये ओढत नेतील; त्यांची वस्ती खातरीने त्यांच्यामुळे विस्मय पावेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. बाबेलच्या लोकांच्या भूमीविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर बाबेलाविरूद्ध परमेश्वराने जी योजना ठरवली आहे ती, खास्द्यांच्या देशाविरूद्ध जे संकल्प केले आहेत तेही ऐका; ते खचित कळपातील लहानांनादेखील, ओढून नेतील, त्यांचे कुरणाचे देश नाशाची जागा होईल.