Jeremiah 50:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझे लोक चुकलेल्या मेंढराप्रमाणे आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी (नेत्यांनी) त्यांना चुकीच्या मार्गाने नेले. त्यांना डोंगर टेकड्यांतून भटकायला लावले. ते त्यांच्या विश्रांतीची जागा विसरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांना बहकवले आहे; ते पहाडापहाडांतून भटकले आहेत; ते आपले विश्रांतिस्थान विसरले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझे लोक हरवलेली मेंढरे होती; त्यांच्या मेंढपाळांनीच त्यांची वाट चुकविली त्यांना डोंगरांवर भटकण्यासाठी सोडून दिले होते. ते डोंगर व पर्वतावर भटकत राहिले व त्यांच्या मेंढवाड्यास ते विसरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे लोक हरवलेला कळप असे झाले आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना डोंगरात भटकविले आहे. त्यांनी त्यांना टेकड्या टेकड्यांतून फिरवले आहे. ते गेले, ते कोठे राहत होते ती जागा ते विसरले.