Jeremiah 51:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलच्या तटासमोर झेंडा उभारा. जास्ती रक्षक आणा. पहारेकऱ्यांना त्यांच्या जागी उभे करा. छुपा हल्ला करण्याची तयारी करा. परमेश्वर, त्याने ठरविल्याप्रमाणे करील. बाबेलच्या लोकांविरुद्ध, त्याने सांगितल्याप्रमाणे, तो कारवाई करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलच्या कोटांसमोर ध्वज उभारा; पहारा मजबूत करा, पहारेकरी ठेवा; छापा घालण्याची तयारी करा; कारण परमेश्वर बाबेलच्या रहिवाशांविरुद्ध जे बोलला त्याची योजना करून ते त्याने सिद्धीसही नेले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलच्या तटबंदीविरुद्ध तुमचे झेंडे उंच करा! पहारेकऱ्यांची कुमक पाठवून मजबूत करा, पहारेकऱ्यांना स्थानबद्ध करा, दबा धरून बसण्याची तयारी करा! याहवेहनी बाबेलच्या लोकांविरुद्ध दिलेल्या फर्मानाचा हेतू ते सिद्धीस नेतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा. पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा, कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे.