Jeremiah 51:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण याकोबाचा अंश (देव) त्या टाकाऊ पुतळ्यांसारखा नाही. लोकांनी देवाला निर्माण केले नसून, देवाने त्या लोकांना निर्माण केले. प्रत्येक गोष्टीचा निर्माता तोच एकमेव आहे. त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो याकोबाचा वाटा तो त्यांच्यासारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे, इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.