Jeremiah 51:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांची सिद्धता करा. मेद्यांच्या राजांना सज्ज करा. त्यांच्या अधिपतींना आणि अधिकाऱ्यांना लढण्यासाठी तयार करा. बाबेलच्या अंमलाखालच्या सर्व देशांना बाबेलच्या विरुद्ध लढण्यास सिद्ध करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सज्ज करा, मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा— मेदिया राजे, त्यांचे राज्यपाल आणि अधिपती, आणि ज्यावर ते शासन करतात अशी सर्व राष्ट्रे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा.