Jeremiah 51:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वेदना होत असल्याप्रमाणे भूमी कापते व हालते. बाबेलबद्दल परमेश्वराने ठरविलेला बेत परमेश्वराने सिद्धीस नेताच भूमी कंप पावेल. बाबेलचे निर्जन वाळवंटात रुपांतर करण्याचा देवाचा बेत आहे. तेथे कोणीही राहणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे; कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भूमी थरथरत व वेदनांनी तळमळत आहे, कारण याहवेहने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प कायमचा आहे— बाबेलची भूमी ओसाड होईल जेणेकरून तिथे कोणीही राहणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत.