Jeremiah 51:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलच्या सैनिकांनी लढाई थांबवली आहे. ते त्यांच्या किल्ल्यांतच राहिले आहेत. त्यांची शक्ती संपली आहे ते बायकांप्रमाणे घाबरुन गेले आहेत. बाबेलमधील घरे जळत आहेत. तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबिलोनचे योद्धे युद्ध करण्याचे थांबले आहेत; ते त्यांच्या गडात बसून आहेत. त्यांचे सामर्थ्य संपुष्टात आले आहे; ते दुर्बल झाले आहेत. तिचे आवास जळत आहेत; तिच्या प्रवेशद्वाराच्या सळया मोडल्या आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.