Jeremiah 51:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो, “बाबेल म्हणजे जणू काही खळे आहे. सुगीच्या वेळी लोक फोलकटापासून दाणे वेगळे करण्यासाठी धान्य झोडपतात आणि बाबेलला झोडपण्याची वेळ लवकरच येत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “बाबेलची कन्या अशा खळ्याप्रमाणे आहे जिची तुडवणी सुरू होण्याची वेळ आली आहे; तिचे पीक घेण्याचा समय लवकरच येणार आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मळण्याच्या वेळी खळे जसे असते त्यासारखी बाबेलाची कन्या आहे. तिला पायाखाली तुडवण्याची वेळ आहे. अजून थोडा अवकाश आहे, मग तिच्या कापणीचा समय येईल.”