Jeremiah 51:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्हाला दुखविण्यासाठी बाबेलने भंयकर गोष्टी केल्या. आता त्याची परतफेड करण्याची आमची इच्छा आहे.” सियोन मध्ये राहणारे लोक असे म्हणाले. “आमच्या लोकांना मारण्याचा अपराध बाबेलच्या लोकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना आता सजा मिळत आहे.” यरुशलेम नगरी अशी म्हणाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सीयोननिवासिनी म्हणो, ‘माझ्यावर व माझ्या शरीरावर केलेला जुलूम बाबेलवर उलटो;’ व यरुशलेम म्हणो, ‘माझ्या रक्तपाताचा दोष खास्दी देशाच्या रहिवाशांवर असो.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीयोनचे रहिवासी म्हणतात, आमच्या संतानांवर जसा अत्याचार केला, तसा बाबेलवर येवो,” यरुशलेम म्हणते, “आमचे रक्त सांडल्याचा सर्व दोष बाबेल्यांवर पडो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील. “माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरूशलेम म्हणेल.