Jeremiah 51:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“शेशखचा” पराभव होईल. सर्व जगातील अत्युत्तम व गर्विष्ठ देशाला कैदी बनवले जाईल. दुसऱ्या राष्ट्रांतील लोक बाबेलकडे पाहून भयभीत होतील. कारण बाबेलला उध्वस्त होताना त्यांनी पाहिले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेशख1 कसे हस्तगत झाले आहे! सर्व जगाच्या प्रशंसेचा विषय परहाती कसा गेला आहे! राष्ट्रांना बाबेल कसा विस्मयावह झाला आहे!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“शेशाक कसे हस्तगत केल्या जाईल, संपूर्ण पृथ्वीचे अभिमान पात्र जप्त केल्या जाईल! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड होईल!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे.