Jeremiah 51:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझ्या माणसांनो, भिऊ नका. अफवा पसरतील, पण घाबरु नका. एक अफवा ह्या वर्षी तर दुसरी पुढल्या वर्षी येईल. देशातील भयानक युध्दाबद्दल अफवा पसरतील. राजांच्या एकमेकांविरुद्ध चाललेच्या लढाईबद्दल वावड्या उठतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशात ऐकलेल्या अफवेने तुम्ही आपले मन खचू देऊन घाबरू नका; एक अफवा एका वर्षी व दुसरी दुसर्‍या वर्षी पसरेल; देशात जुलूम होईल, अधिपती अधिपतीवर उठेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुम्हाला देशात अफवा ऐकिवात येतील तेव्हा तुमचे अंतःकरण खचू देऊ नका किंवा भयभीत होऊ नका; देशात आणि एका राजाने दुसऱ्या राजाविरुद्ध केलेल्या हिंसाचारांच्या अफवा ऐकू येतील, एक अफवा या वर्षी येते तर दुसरी पुढील वर्षी येते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील.