Jeremiah 51:53 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कदाचित् बाबेल आकाशाला टेकेपर्यंत वाढली असती. बाबेलने आपले किल्ले मजबूत केले असते. पण मी तिच्याविरुद्ध लढण्यास माणसे पाठवीन, आणि ते तिचा नाश करतील.” परमेश्वर असे म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबिलोन जरी गगनापर्यंत पोचली आणि तिने आपल्या गढांची तटबंदी केली, तरी मी तिच्याविरुद्ध विनाशक पाठवेन,” याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो.