Jeremiah 52:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले. मग त्याला बेड्या घालून बाबेलला नेले. तेथे त्याने सिद्कीयाला तुरुंगात टाकले. सिद्कीया मरेपर्यंत तुरुंगातच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने सिद्कीयाचे डोळे फोडले; बाबेलच्या राजाने त्याला बेड्या घालून बाबेलास नेले व त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत त्याला कैदेत ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबिलोन राजाकडे बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले. व बाबेलला नेऊन मरेपर्यंत तुरुंगात टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.