Jeremiah 52:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराचा कोप ओढवून घेतल्याने यरुशलेम व यहूदामध्ये भयंकर गोष्टी घडल्या. शेवटी परमेश्वराने यरुशलेम व यहूदा येथील लोकांना आपल्या दृष्टीसमोरुन दूर केले. सिद्कीया बाबेलच्या राजाच्या विरोधात गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरूशलेम व यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले.