Jeremiah 6:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरुशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा! यरुशलेममधून पळून जा! तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या! कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे, भयंकर विनाश.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरूशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.