Jeremiah 6:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चांदी शुद्ध करणाऱ्या कारागिराप्रमाणे ते आहेत. फुंकणीने जोरात फुंकताच विस्तवाचा जाळ झाला आणि त्यातून शिसे बाहेर आले. चांदी शुध्द करण्याच्या प्रयत्नात त्या कारागिराने आपला वेळ वाया घालविला. त्याचप्रमाणे माझ्या लोकांमधून दुष्टपणा काढला गेला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भाता फुंक फुंक फुंकला आहे, शिसे जळून खाक झाले आहे; ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे. शुद्ध करणारा अग्नी शिसे भस्म करीत आहे, परंतु हे शुद्धीकरण व्यर्थ होत आहे, दुष्ट मार्गानी चालणारे पूर्णपणे शुद्ध होत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भाता जळाला आहे, अग्नीतून शिसे जळून निघाले आहे, ते स्वत:ला व्यर्थच गाळीत राहतात, कारण जे दुष्ट ते काढून टाकलेले नाहीत.