Jeremiah 7:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दाराजवळ उभा राहा आणि हा उपदेश कर: “यहूदातील सर्व लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. देवाची पूजा करण्यासाठी आत येणाऱ्या सर्व लोकांनो, ऐका!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर: यहूदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या द्वारांनी आत जाता ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर: “ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका!