Jeremiah 8:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे: “त्या वेळी, लोक यहूदाच्या राजाची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरुशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील. ते ती हाडे चंद्र सूर्य तारे यांच्या खाली जमिनीवर पसरती. यरुशलेमच्या लोकांना चंद्र सूर्य तारे यांच्यावर प्रेम करायला, त्यांना अनुसरायला, त्यांचा सल्ला घ्यायला आणि त्यांची पूजा करायला आवडते. कोणीही ती हाडे गोळा करुन परत पुरणार नाही. ती हाडे जमिनीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, त्या काळात यहूदाच्या राजांच्या अस्थी, त्यांच्या सरदारांच्या अस्थी, याजकांच्या अस्थी, संदेष्ट्यांच्या अस्थी व यरुशलेमकरांच्या अस्थी त्यांच्या कबरांतून बाहेर काढतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो: त्यावेळी, ते यहूदातील राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरूशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.