Jeremiah 8:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे. पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही. म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल. मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील. परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल, असे याहवेह म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील, असे परमेश्वर म्हणतो.