Jeremiah 9:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, या गोष्टी सांग: परमेश्वर म्हणतो, ‘मृत शरीरे खताप्रमाणे शेतांत पडतील. शेतकऱ्यांनी कापलेल्या धान्याप्रमाणे ती जमिनीवर पडतील. पण त्यांना गोळा करणारे कोणीही नसेल.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात: “ ‘मृतदेह उघड्या जागांवर विष्ठेप्रमाणे पसरली जातील; कापणार्यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील, आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत.