Jeremiah 9:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला ह्या गोष्टीसाठी मारु द्या. तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारु द्या. मी परमेश्वर आहे, मी कृपाळू व न्यायी आहे, जगात चांगल्या गोष्टी मी करतो आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारु द्या.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाळगायचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याविषयी बाळगावा; ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी मी याहवेह, जो कृपा करणारा पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, असे त्यांनी मला खरोखर समजावे, ह्यात मला संतोष आहे, असे याहवेहने म्हणतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो, कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो.