Jeremiah 9:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदाच्या लोकांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. ते खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर हल्ला करण्याचा बेत आखत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे; ते असत्य बोलतात; ते तोंडाने शेजार्याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्याच्यावर टपून असतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात.