Job 1:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे जे काही करतो त्यांत तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण त्याचे घरदार व जे सर्वकाही त्याचे आहे त्याभोवती कुंपण घातलेले नाही का? तुम्ही त्याच्या हाताचे श्रम आशीर्वादित केले आहेत व देशात त्याचे कळप आणि गुरे वृद्धी पावत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्याच्या भोवती, त्याच्या घरासभोवती, आणि त्याच्या सर्वस्वाच्या प्रत्येक बाजूस कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हातांच्या कामांस यश दिले आहेस, आणि भूमीत त्याचे धन वाढत आहे.