Job 1:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसरा निरोप्या हे सांगत असतानाच आणखी एक निरोप्या आला. तिसरा निरोप्या म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवल्या. त्यांनी हल्ला करुन उंट पळवून नेले आणि नोकरांना मारुन टाकले. फक्त मीच त्यातून सुटून तुला सांगायला आलो आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून उंटांवर घाला घातला व ते ते घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले, हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो बोलतच आहे इतक्यात, आणखी एक निरोप्या आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या केल्या व उंटांवर आक्रमण करून त्यांना घेऊन गेले; त्यांनी चाकरांना तलवारीने वधले, हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो बोलत असतांनाच, आणखी दुसरा आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून, त्यांनी उंटावर हल्ला केला, आणि ते त्यांना घेवून गेले. होय, आणि त्यांनी तलवारीच्या धारेने नोकरांना मारुन टाकले, आणि हे तुला सांगावयास मीच निभावून आलो आहे.”