Job 1:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब जवळ 7000 मेंढ्या, 3000 उंट, 1000 बैल आणि 500 गाढवी होत्या तसेच खूप नोकरही होते. पूर्वेकडच्या देशांतील तो सर्वात श्रीमंत माणूस होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता.