Job 10:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी दुष्ट झालो तर हायहाय करावी लागेल. मी नीतिमान झालो तरी लज्जेने व्याप्त होऊन व माझी विपत्ती पाहून मी आपले डोके वर करणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर मी दोषी असेन; तर माझा धिक्कार असो! मी निष्पाप असलो, तरीसुद्धा मी माझे डोके उंच करू शकत नाही, कारण मी लज्जेने व्याप्त झालो आहे आणि माझ्या दुःखात बुडून गेलो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.