Job 2:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोबने बायकोला उत्तर दिले, “तू एखाद्या मूर्ख बाईसारखी बोलत आहेस. देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. तसाच आपण संकटांचाही स्वीकार तक्रार न करता केला पाहिजे.” त्याच्या संकटकाळातसुध्दा ईयोबने पाप केले नाही. तो देवाच्याविरुध्द बोलला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतू तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहीजे वाईट नाही काय?” तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत ईयोबाने त्याच्या बोलण्याद्बारे पाप केले नाही.