Job 2:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना. तो खूप वेगळा दिसत होता. त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आपल्या डोक्यावर उडवून घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी ईयोबाला दुरून न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्यांना ओळखता येईना; मग ते मोठ्याने रडले; प्रत्येकाने आपला झगा फाडला आणि आकाशाकडे धूळ उडवून त्यांनी ती आपल्या डोक्यांत घातली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी इय्योबाला दुरून पाहिले, तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत; मग ते मोठ्याने रडू लागले, त्यांनी आपले झगे फाडले आणि आपल्या डोक्यावर धूळ घातली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा त्यांनी दुरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्यांनी त्यास आळखले नाही, ते मोठ्याने रडले, प्रत्येकाने आपआपला स्वतःचा झगा फाडला आणि हवेत धूळ उडवली आणि स्वतःच्या डोक्यावरही घेतली.