Job 24:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा दुष्ट माणूस मरेल आणि त्याची आईदेखील त्याला विसरुन जाईल. त्याची प्रेयसी म्हणजे त्याचे शरीर खाणारे किडे असतील. लोक त्याची आठवण ठेवणार नाहीत. त्यामुळे दुष्टपणा लाकडासारखा मोडून पडेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या मातेचे उदर त्याला विसरेल. कीटक त्याच्यावर चंगळ करतील; त्याचे कोणाला स्मरण उरणार नाही; असा दुष्टांचा वृक्षाप्रमाणे निःपात होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी जन्म घेतलेले उदर त्यांना विसरते, किडे त्यांचा फडशा पाडतात; दुष्टांची आठवण देखील पुन्हा केली जात नाही आणि वृक्षाप्रमाणे ते मोडले जातात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल, त्याची आठवण राहणार नाही, त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल.