Job 3:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो. ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंधकार व मृत्युच्छाया ही त्याला आपला आप्त लेखोत; तो दिवस अभ्राच्छादित होवो; दिवसास जे काळोखी आणते ते सर्व त्याला भयभीत करो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होय, खिन्नता व संपूर्ण काळोख त्यावर पुन्हा आपला हक्क गाजवो; त्यावर ढग वास्तव्य करून राहो; काळोख त्यावर मात करो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो,