Job 32:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु तिथे अलीहू नावाचा तरुण मुलगा होता. अलीहू बरखेलचा मुलगा होता. बरखेल बूजचा वंशज होता. अलीहू राम घराण्यातील होता. अलीहू ईयोबवर खूप रागावला. का? कारण ईयोब आपण स्वत: बरोबर आहोत असे म्हणत होता. ईयोब म्हणत होता की आपण देवापेक्षाही अधिक न्यायी आहोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग राम घराण्यातील बरखेल बूजी ह्याचा पुत्र अलीहू ह्याचा राग भडकला; ईयोबाने देवाला निर्दोषी ठरवण्याचे सोडून स्वतःला निर्दोषी ठरवले, म्हणून त्याच्यावर त्याचा राग भडकला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला.