Job 7:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा मी गप्प बसणार नाही. मी बोलेन. माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत. माझा आत्मा अगदी कडू जहर झाला आहे म्हणून मी तक्रार करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे मी आपले तोंड आटोपणार नाही; मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेन; माझ्या जिवास क्लेश होतात म्हणून मी गार्हाणे करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून मी शांत राहणार नाही; मी आपल्या आत्म्याचा खेद उघड करून सांगेन, माझ्या जिवाच्या कडूपणात मी गार्हाणे करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मी गप्प बसणार नाही, मी माझ्या आत्म्याच्या क्लेशातून बोलेन, माझ्या जिवाच्या कडूपणातून मी बोलेन.